importance of daan in pitru paksha

परमार्थ व पितरांबद्दल कृतज्ञता

पितृपक्ष व दानाचे महत्व

गुरूदेव दत्त,

भारतीय परंपरा आणि तत्त्वज्ञानानुसार, चार ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता-पिता, निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध’.

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने ‘केले जाते, ते ‘श्राद्ध’ होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुण पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी कायम राहते, अशी मान्यता आहे.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात सर्वच विधिपूर्वक होईल असे नाही , पण आपल्या समर्थ सदगुरु परंपरेने विधी अगदी सोपा करून सांगितला आहे.आपण समर्थ सदगुरु शंकर महाराजांच्या चमत्कारी मोहक पादुकांना रुद्राभिषेक व नंतर महाराजांची पंचपदी व नैवद्य आरती करून ह्या पितरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
यंदा ही पितृपक्षानिमित्ताने नैमित्तिक कर्म म्हणून

श्रीशंकर मठ ,तांदुळवाडी येथे दि.२९/९/२०२४ रोजी रविवारी,वेळ सकाळी ९.३० वाजता, रुद्राभिषेक ,पंचपदी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तसेच ह्या पितृपक्षात दानाला ही अनन्य साधारण महत्व आहे.आपण सर्वजण पितरांच्या प्रित्यर्थ मठाच्या कार्यात कमीत कमी रुपये 1000/- व त्यापेक्षा जास्त दान करून पितराबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात.

।।जय शंकर।।

ऑनलाईन नोंदणी इथे करा कोड स्कॅन करा अपलोड बटण वापरून पावती संलग्न करा


Shree Shankar Maharaj Kundalinni Awakening & Research Trust

Main: +91 9823222248

Office:- (255) 352-6259

Enquiry: (255) 352-6260

Address

Tandulwadi , Mandwa, Dist Shambhaji Nagar,Maharshtra

Pincode-431133

Seva Starts at : 7am – 6pm daily

Translate »