SSKART
श्रीक्षेत्र शंकर महाराज मठ
आमंत्रण स्वीकार
॥ जय शंकर ॥

०३ मे  —  १० मे, २०२६  ·  तांदुळवाडी

श्री शंकर कुण्डलिनी अवेकनिंग अँड रिसर्च ट्रस्ट आयोजित

श्री पुरुषोत्तम पंचायतन

मूर्ती प्राणप्रतिष्ठा व हवन सोहळा
Shree Vishnu Panchayatan

पाच दैवतांच्या पावन सान्निध्यात अनुभवा आध्यात्मिक चैतन्याचा आणि सनातन परंपरेचा दिव्य सोहळा.

Countdown to the Mahotsav

सोहळ्यास शिल्लक

00
दिवस
Days
00
तास
Hours
00
मिनिटे
Minutes
00
सेकंद
Seconds

शुभारंभ : रविवार, ३ मे २०२६, दुपारी ३:०० वाजता — शोभायात्रा

About the Mahotsav

एका दिव्य सोहळ्याचा
पावन आरंभ

समर्थ सद्‌गुरू श्री शंकर महाराजांच्या कृपेने श्रीक्षेत्र शंकर महाराज मठ, तांदुळवाडी येथे प्रथमच ‘श्री पुरुषोत्तम पंचायतन’ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच स्वाहाकार (हवन) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ०३ मे ते १० मे २०२६ या सप्ताहात वेदमंत्रांच्या मंगलध्वनीत, यज्ञकुंडाच्या दिव्य तेजात आणि भक्तिरसाच्या सागरात सर्व भाविकांना पावन होण्याचे हार्दिक निमंत्रण.

श्री विष्णू, श्री गणेश, श्री शिव, श्री सूर्यनारायण आणि श्री देवी भगवती या पंच देवतांच्या एकत्रित सान्निध्यात होणारा हा सोहळा, तांदुळवाडीच्या पवित्र भूमीवर चिरकाल टिकणारी आध्यात्मिक ऊर्जा प्रस्थापित करील. आपल्या सहभागानेच हा यज्ञ पूर्णत्वास जाईल.

Dates
०३ – १० मे, २०२६
Sthal
तांदुळवाडी, गंगापूर
Deities
पंच देवता
हवन मंडप
।। श्रीगुरुदेव दत्त ।।

“यज्ञो वै विष्णुः।” — यज्ञ हे स्वतः भगवान विष्णूंचे स्वरूप आहे. या दिव्य यज्ञात सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, हीच प्रार्थना.

The Five Deities

पंच दैवतांचे पावन सान्निध्य

जगातील एकमेव ‘औदुंबर कल्पवृक्षराज पंचायतन’ मंदिराच्या परिसरात पाच दैवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे — प्रत्येक दैवत वेगळी उर्जा, वेगळा आशीर्वाद घेऊन येते.

Shri Vishnu
श्री पुरुषोत्तम
Shri Vishnu

सुख समृद्धी, आनंदी आयुष्य, नकारात्मक शक्तीपासून सुरक्षा व मनःशांती, स्थिरता आणि मनोकामना पूर्तीसाठी.

Shri Ganesha
श्री गणेश
Shri Ganesha

येणाऱ्या अडीअडचणीतून सुटका, बुद्धी आणि ज्ञानवृद्धीसाठी, सुख-शांती, समृद्धी व आरोग्यासाठी, विवाह व संततीसाठी, शत्रूवर विजयप्राप्तीसाठी.

Shri Shiva
श्री शिव
Shri Shiva

आध्यात्मिक शांती व मोक्षप्राप्तीसाठी, दैवी शक्तीप्राप्तीसाठी, शनि साडेसाती दोष कमी होऊन आध्यात्मिक व इतर क्षेत्रातील यशप्राप्तीसाठी.

Shri Surya
श्री सूर्यनारायण
Shri Surya

मानसिक व शारीरिक आरोग्य कल्याणासाठी, समृद्धीसाठी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होण्यासाठी.

Shri Devi Bhagawati
श्री देवी भगवती
Shri Devi Bhagawati

जगदंबेची कृपा प्राप्त व्हावी, मन-शरीर व आत्मा शुद्धीसाठी, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा, शांती व प्रसन्न आनंदी वातावरण निर्माण होण्यासाठी.

Eight Days of Sanctity

कार्यक्रमाची रूपरेषा

०३ मे ते १० मे २०२६ — आठ दिवसांच्या या पावन सप्ताहात प्रत्येक दिवस विविध विधी संपन्न होतील.

Day 1 · Sunday
०३ मे २०२६
शोभायात्रा
दुपारी ३ वाजता
  • मांडवा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून श्री शंकर महाराज मठ पर्यंत सर्व देवतांच्या मूर्तींसह शोभायात्रा
Day 2 · Monday
०४ मे २०२६
संकल्प व मंडप पूजन
सत्र पहिले · सकाळी ७ ते ११
  • संकल्प, पंचगव्य, पवित्र धारण, मुख्य संकल्प
  • पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध
  • आचार्य वरण (ब्राह्मण पूजन)
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६
  • मंडप पूजन, प्रदक्षिणा, ध्वजपूजन, द्वारप्रदक्षिणा
  • मूर्ती शोभायात्रा, बिल्व अर्चन
  • आरती व महाप्रसाद
Day 3 · Tuesday
०५ मे २०२६
शांती होम व अधिवास
सत्र पहिले · सकाळी ७ ते १
  • शांती होम
  • जलाधीवास, शय्याधीवास
  • कंकणबंधन
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६:३०
  • देवता स्थापन
  • दुर्वार्चन, शमीअर्चन
  • आरती व महाप्रसाद
Day 4 · Wednesday
०६ मे २०२६
अग्नि स्थापन व हवन प्रारंभ
सत्र पहिले · सकाळी ९ ते १
  • अग्नि स्थापन
  • औषधी स्नान
  • कलश स्थापन
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६:३०
  • हवन प्रारंभ
  • धान्याधीवास
  • आरती व महाप्रसाद
Day 5 · Thursday
०७ मे २०२६
हवन व दीपोत्सव
सत्र पहिले · सकाळी ९ ते १
  • हवन, पर्यायी होम
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६:३०
  • हवन, पुष्पाधिवास
  • आरती, महाप्रसाद
  • दीपोत्सव व भस्म आरती
Day 6 · Friday
०८ मे २०२६
हवन व फलाधिवास
सत्र पहिले · सकाळी ९ ते १
  • हवन, पर्यायी होम
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६:३०
  • हवन, फलाधिवास
  • तुलसीअर्चन, कुंकुमार्चन व इतर अर्चन
  • आरती व महाप्रसाद
Day 7 · Saturday
०९ मे २०२६
हवन व मूर्ती गर्भगृह स्थापना
सत्र पहिले · सकाळी ९ ते १
  • हवन
सत्र दुसरे · दुपारी ३ ते ६:३०
  • हवन
  • पंचायतन मूर्ती गर्भगृहात ठेवणे
  • नैवेद्य, आरती, महाप्रसाद
Day 8 · Sunday
१० मे २०२६
मुख्य प्राणप्रतिष्ठा व समारोप
✦ मुख्य प्राणप्रतिष्ठा मुहूर्त · सकाळी ०८:०० वा.
सत्र पहिले · सकाळी ९ ते १
  • प्रायश्चित्त हवन, मुख्यदेवता हवन
  • प्राणप्रतिष्ठा, राजउपचार पूजा
  • बलिदान, पूर्णाहुति
सत्र दुसरे · दुपारी १ ते १:३०
  • ब्राह्मण पूजन, मनोगत
  • गुरुदेवता पूजन
  • नैवेद्य, आरती, महाप्रसाद

* वेळा व विधी गुरुदेवांच्या निर्देशानुसार बदलू शकतात.

Seva · Daan · Sahabhag

पुण्य पर्वणीत सहभाग

या पुण्य पर्वणीत हवन, अन्नदान व भिक्षा दान असा सेवा करण्याचा अलभ्य योग सर्व भाविकांसाठी उपलब्ध आहे.

Havan Participation

हवनात सहभाग

₹3,100/ एक दिवस
  • आपण आपल्या जोडीदारासह किंवा वैयक्तिक सहभाग घेऊ शकता. परिचित व ओळखीचे इच्छुकही सहभागी होऊ शकतात.
  • हवनात सहभाग घेण्यासाठी रु. ३,१००/– संस्थेच्या खात्यात ऑनलाईन जमा करावी.
  • रक्कम जमा केल्यानंतर स्क्रीनशॉट खालील संयोजकांपैकी एकाकडे पाठवून नोंदणी निश्चित करावी.

पूजा, हवन सामग्री, दान, दक्षिणा, चहा-नाश्ता, भोजन इत्यादी व्यवस्था वरील रक्कमेत समाविष्ट आहे.

Coordinators · Sanyojak

संयोजक मंडळ

1.श्री. दीपक सराफ
+91 77098 90263
2.श्री. विष्णु बक्षी
+91 99757 64197
3.श्री. प्रकाश मुधळवाडकर
+91 98232 22248
4.श्री. रविंद्र गडप्पा
+91 99217 47828
WhatsApp वर संपर्क साधा

Organiser · Aayojak

श्री शंकर कुण्डलिनी अवेकनिंग
अँड रिसर्च ट्रस्ट

Regd. No. F-21255 (R) · Chhatrapati Sambhajinagar

समर्थ सद्‌गुरू श्री शंकर महाराजांच्या कृपेने तांदुळवाडी येथील तीन एकर पावन भूमीवर श्रीक्षेत्र शंकर महाराज मठाचे भव्य निर्माण सुरू आहे. गुरुनिवास, पंच-पल्लव मंदिर, गोशाळा, सभागृह या कार्यांच्या माध्यमातून संत परंपरेच्या प्रकाशात एक सुसंस्कृत, विचारशील समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे.

Mathadhipati
प.पू. श्री. स्वरसिद्धनाथ महाराज
पं. डॉ. पराग श्रीराम चौधरी
Adhyaksha
प.पू. सिद्धानंदिनाथ गुरुमाऊली
विदुषी सौ. मीनाक्षी पराग चौधरी
swarparag.com →
Original Invitation

— Original Invitation —

Kindly Confirm Your Presence

आपली उपस्थिती
नोंदवा

सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी कृपया खालील माहिती भरून WhatsApp द्वारे आपली उपस्थिती कळवावी. आपल्या सहभागाने यज्ञ पूर्णत्वास जाईल.

Reach the Sanctum

सोहळा स्थळ

श्रीक्षेत्र शंकर महाराज मठ, तांदुळवाडी, मांडवा,
ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर,
महाराष्ट्र – ४३११३३